लोकसत्तेचे संपादक गिरीश कुबेरांचे बरेच अग्रलेख चांगले असतात. त्यांचं मराठी सुद्धा ओघवतं आणि प्रभावी आहे. कुबेरांची "औषध कंपन्यांना फायदा व्हावा म्हणून रोग/महामाऱ्या पसरवतात" अशी एक चित्रफीत समाज माध्यमांवर गेल्या महिन्यात भलतीच लोकप्रिय झाली आहे. ती पाहून मात्र निराशा झाली. एखादं माध्यम हातात असलेल्या माणसाने जबाबदारीने बोलणं ही किमान अपेक्षा सुद्धा त्यांनी धुळीस मिळवली आहे. चित्रफीत इथे https://youtu.be/KXQxh5wfvJY?t=1225
ह्यात ते काय म्हणतात?
"२००४ साली बुश ह्यांनी एका आरोग्य योजनेत प्रचंड बजेट काही विशिष्ट कंपन्यांना जाहीर केलं. त्यात गिलियड (ते हा शब्द जिलाद असा उच्चारतात!) कंपनी होती. त्या कंपनीचं टॅमिफ्लू हे एकमेव औषध होतं. ते एका विशिष्ट आजारावरच उपयोगी पडत होतं. ही कंपनी बंद पडायला आली होती. त्या कंपनीच्या लिलावाच्या वेळेला ब्राझिलमध्ये बरोबर बर्ड फ्लू सुरू झाला आणि ही कंपनी प्रचंड नफा करू लागली. कंपनी फायद्यात आल्याबरोबर त्यांनी रोश नावाच्या मोठ्या कंपनीला ती विकली. त्याबरोबर बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू सगळे बरोबर निघून गेले. ज्यांनी ही कंपनी विकली, ते कंपनीचे प्रवर्तक डोनाल्ड रम्सफेल्ड हे अमेरिकेचे संरक्षणमंत्री होते."
१. बर्ड फ्लू ब्राझिलमधून आलाच नाही. नव्वदच्या दशकाच्या शेवटी आशियाई देशांमध्ये बर्ड फ्लू झाला. स्वाइन फ्लू २००९ मध्ये ब्राझिलमध्ये सुरू झाला. रम्सफेल्ड हे २००१-२००६ संरक्षण मंत्री होते आणि टॅमिफ्लूला अमेरिकेने १९९९मध्येच परवानगी दिलेली होती.
२. रोशने (आजही) गिलियड विकत घेतलेलीच नाही. त्यांनी टॅमिफ्लूचे हक्क १९९६ मध्येच विकत घेतलेले होते आणि त्या विक्रीवर गिलियडला रॉयल्टी मिळते.
३. गिलियडचे टॅमिफ्लू हे एकमेव औषध नव्हते. त्यांचे HIV वरही औषध होते. ते मुख्यत: antiviral (विषाणूंवरच्या) औषधांवर संशोधन करतात.
४. भारतीय कंपनी सिपलाने २००८ मध्ये भारतात टॅमिफ्लू स्वस्तात तयार करण्याचा खटला जिंकला आणि WHO (जागतिक आरोग्य संघटना) कडून तशी परवानगीही मिळवली. मग २००९ ला आलेल्या स्वाइन फ्लू साथीबद्दल सिपलाला आधीच समजलं होतं, असं म्हणायचं का?
ह्याचा अर्थ टॅमिफ्लूबद्दल काहीच विवाद नाहीत, असा अजिबात नाही. २००३च्या सार्सच्या आजारामुळे आणि बर्ड फ्लूच्या भीतीमुळे अमेरिका, युरोप आणि इतर देशांनीही टॅमिफ्लूचा पुष्कळ साठा केला आणि त्यामुळे गिलियड आणि रोशला प्रचंड फायदा झाला. मात्र ज्या अभ्यासांच्या आधारे टॅमिफ्लूची परिणामकारकता आणि उपयुक्तता ठरवण्यात आली, ते बरेचसे अभ्यास रोशनेच प्रायोजित केले होते. स्वतंत्र अभ्यास झाले नव्हते. टॅमिफ्लूचे दुष्परिणामही लपवले गेले होते. हे नंतर झालेल्या संशोधानांमध्ये उघडकीस आलं. ते ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्धही झालं. टॅमिफ्लूबद्दलचा विवाद आणि राजकारण हे त्याच्या परिणामकारकतेबद्दल आहे. मात्र त्या लोकांनी रोग पसरवला, असे कुठलेही पुरावे नाहीत. खरं तर ज्या औषधाच्या परिणामकारकतेबद्दल मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि त्याबद्दलच्या अभ्यासात लबाडी केलेली आहे, ते औषध तयार करणारे रोग आणतील/पसरवतील का? अशाने हात दाखवून अवलक्षण होणार नाही का?
षड्यंत्र, कारस्थान इ. ऐकाय-वाचायला चांगलं वाटतं. लोक लगेच कान टवकारून ऐकतात. सध्याच्या काळात तर अजूनच प्रसिद्धी मिळते. म्हणून जबाबदारीचं भान ठेवू नये का? आज पुन्हा एकदा कुबेरांनी गिलियडबद्दल (जिलाद!) लेख लिहिला आहे. त्यात सुरुवातीलाच ‘रेमडिसिव्हिर’ (Remdesivir) ही 'लस' आहे, असं म्हटलं आहे. खरं तर ही लस नसून antiviral (विषाणूंवरचं) औषध आहे. लेखात पुढे बरंच काही म्हटलं आहे. ते सगळं तपासल्याखेरीज अर्थातच विश्वास ठेवता येणार नाही. आजचा लेख https://www.loksatta.com/vishesh-news/article-on-vaccine-company-for-corona-shares-of-jilad-sciences-plummeted-abn-97-2141426/