बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१

छंद असा लागला

 कौटुंबिक आणि आर्थिक आघाडी बऱ्यापैकी स्थिरावल्यानंतर बऱ्याचदा 'पुढे काय' हा प्रश्न पडू लागतो. पन्नाशीच्या आसपास बऱ्याच लोकांना तो पडतो. कर्तृत्वाचे झेंडे लावायची, काहीतरी करून जगाला दाखवून द्यायची हौस आणि गरज बऱ्यापैकी संपलेली असते. आपण पुन्हा लहान होऊ लागतो. शांतपणे करता येईल असं, आपल्याला आवडतं म्हणून करायला काही शोधू लागतो. शिकण्यातला, करून बघण्यातला आनंद अनुभवू लागतो. अशावेळी दहा-पंधरा मिनिटांची एखादी अशी कृती हाती लागते, की तेवढा काळ तुम्ही मूल होऊन त्यात गुंतून जाता, हरवून जाता. तेवढा वेळ तुम्ही वर्तमान काळात राहता.

मला माझ्या लेकीमुळेअसाच एक छंद गेले काही महिने गवसला आहे. तिचा स्क्रीन बघायचा वेळ कमी करायचा म्हणून तिच्यासाठी काही ना काही उद्योग आम्ही शोधत असतो. त्यातूनच तिला सुट्टीत बागेतल्या पाना-फुलांच्या रांगोळ्या, चित्रं करायला सुचवली आणि तिच्याबरोबर मीही करू लागले. तिने काही दिवस केलं, पण हळूहळू तिला कंटाळा आला आणि मग मीच ते करत राहिले. हे  किती दिवस चालेल, ते मलाही माहीत नाही. पण माझ्यासारख्या चित्रकलेत कधीच गती नसलेल्या व्यक्तीला काहीतरी आकार करायला येतात, याचंच  खूप अप्रूप वाटतं!    

असं म्हणतात, की कला ही एक प्रकारची ध्यान-धारणाच असते. शांत करणारी उपचार-पद्धती असते. पण कला ही खूप मोठी गोष्ट झाली. सगळेच काही तो पल्ला गाठू शकत नाहीत. त्यामुळे सामान्य माणसाला काहीतरी करून बघता आलं, मूल होऊन त्यात रमता आलं तर त्यातही तो  विसावा लाभतो, असा अनुभव ह्या निमित्ताने आला. 
 
पाडवा 



गजानना श्री गणराया 


लावण्ये साजतो 









तुंदिल तनू तरी चपल साजिरी 



दृष्टीचा डोळां पाहों मी गेलीये । तंव भीतरीं पालटु झाला ॥




पर्यावरण दिवस 







गुरुपौर्णिमा 




राज्याभिषेक दिवस 






रिमझिम रेशिमधारा, उलगडला झाडांतुन अवचित .. 












निळावंती 





 

योग दिवस