ओढ देणारा लहरी पाऊस
चिंब भेटीचा कहरी पाऊस
नवा नवेला सृजन पाऊस
हिरवागार शिंपण पाऊस
पाण्यावर थुई थुई नाचणारा पाऊस
वाऱ्यावर झेपावत भिडणारा पाऊस
रिमझिम रिमझिम नाचाचा पाऊस
रिपरिप रिपरिप जाचाचा पाऊस
गडगडाटी अचाट पाऊस
घुसणारा पिसाट पाऊस
विजेमधे लकाकता पाऊस
पाकळीवरती चकाकता पाऊस
आठवणींमधे रुणझुणणारा पाऊस
अवचित मनाशी गुणगुणारा पाऊस
नको तेव्हा मधेच भुणभुणणारा पाऊस
कुठल्याही वयातला तरुण तरुण पाऊस
पानांमधून टपटप पाऊस
अवेळीच कधी डबडब पाऊस
सांजवेळी हुरहूर पाऊस
रात्र रात्र झुरझूर पाऊस
कोसळणारा अथांग पाऊस
लोळवणारा तांडव पाऊस
कुशीत घेऊन वेढणारा पाऊस
मायेने कुरवाळणारा पाऊस
उरभर घमघमणारा पाऊस
आत आत झिरपणारा पाऊस
तुझा आणि माझा पाऊस
तरी माझा माझाच पाऊस
माझा माझाच पाऊस
वाह सुंदर !
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवासुंदर 👌🏻
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाअप्रतिम.चपखल शब्दांचा साज लेऊन किती रूपाने भेटला पाऊस.वा!
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा