नितळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नितळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २१ जानेवारी, २०२३

कविता - निर्विकार

 

लांबलेला पावसाळा 
आणि दाटलेला उमाळा 
दिवस आता मोजताहे 
गोठलेल्या सांजवेळा 

कभिन्न कातळ भोवताल 
शब्द नको, नको सुरताल 
इच्छा-निरिच्छा गुंफणारा 
नकोच गोफाचा खेळ 

शांत श्वास नि मिटले डोळे 
नितळ निर्विकार हळुहळु 
निवळशंख निळा निर्झर 
आत पाझरेल झुळुझुळु