केशरी किरणांची पुसट प्रभा फाकलेली
ताडमाड हिरवाई पाण्याशी वाकलेली
कोमल सुकुमार कळी दव-दुलईत झोपलेली
चिवचिवत्या रानालाही लय एक साधलेली
निळाईत पाण्याच्या एकेक सल बुडावा
शांत हा आसमंत श्वासात भरून यावा
जाणीव हरपावी, काळ इथे थांबावा
झिरपावा हृदयतळी मंद गारवा
झिरपावा हृदयतळी मंद गारवा
खूप सुंदर!
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवाहळूवार तरल काव्य आहे.मोरपीस चेर्यावरून फिरल्यासरखे मन शांत निवांत. होते धन्यवाद
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
हटवा