डोंगर काढा फोडून
जंगल काढा कापून
नद्यांना लावा शिस्त
काठावर सिमेंट थापून
वरून घाला विकासाची चमचमती झूल
वरून घाला विकासाची चमचमती झूल
प्रश्नकर्त्या नजरेत फेका प्रगतीची धूळ
शेतांचे करा बंगले
समुद्रात बांधा इमले
पुन्हा पुन्हा खोदून बांधा
पूल, रस्ते सगळे
वरून घाला विकासाची चमचमती झूल
प्रश्नकर्त्या नजरेत फेका प्रगतीची धूळ
कंत्राटांचं पीक घ्यायला
आधी साफ करा झाडं
अहवाल-आकडे तुडवत
दामटा पुढे घोडं
वरून घाला विकासाची चमचमती झूल
प्रश्नकर्त्या नजरेत फेका प्रगतीची धूळ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा