डेव्हिड ईगलमन नावाचे एक अमेरिकन मज्जा वैज्ञानिक (neuroscientist) आहेत. त्यांचं मेंदूवर “The Brain” नावाचं एक उत्कृष्ट पुस्तक आहे. त्यावर आधारित नंतर सहा भागांची (प्रत्येकी एक तास) चित्रफीतही आली. सहा भागांवर सहा लेख लिहायला घेतले आहेत. आज चौथा भाग.
निर्णय कसा होतो, ह्याचा एक प्रयोग दाखवला आहे. एका चित्रफितीत आगगाडीचं छोटं इंजिन रुळावरून येत आहे. त्याचे ब्रेक निकामी झाले आहेत. त्या रुळावर लांबवर इंजिनाकडे लक्ष नसलेले चार मजूर काम करत आहेत. ते इंजिनाखाली मरतील. पण तुमच्याकडे एक कळ आहे. ती दाबून तुम्ही ते इंजिन वेगळ्या रुळांवर वळवू शकता. तिकडे एक मजूर आहे. चार मजूर वाचतील आणि ते करताना एक मरेल. सहभागी झालेल्या प्रत्येकाने कळ दाबण्याचा निर्णय घेतला. आता ह्या प्रयोगात थोडासा बदल केला. आता कळ नाही, दुसरे रुळही नाहीत. तुम्ही जवळच्या टाकीवर उभे आहात आणि तुमच्या शेजारी एक जाड माणूस उभा आहे. तुम्ही जर वरून त्याला इंजिनाच्या वाटेत ढकलून दिलं, तर तो मरेल. पण त्याच्या शरीराच्या अडथळ्यामुळे इंजिन थांबेल आणि मजूर वाचतील. आता मात्र सहभागी झालेल्या प्रत्येकाने न ढकलण्याचा निर्णय घेतला. का बरं? काय बदललं? पहिल्या वेळी हा फक्त गणिताचा प्रश्न होता – एक जीव वाचवायचा की चार! दुसऱ्यावेळी स्वत:च्या हाताने एखाद्याला मृत्यूच्या तोंडी ढकलायचं म्हटल्यावर तिथे भावनिक प्रश्न निर्माण झाला आणि भावना हाताळणारं जाळं कामाला लागलं. त्याने गणिती जाळ्याला हरवलं. जिथे भावनिक गोष्टी दूर सारून निर्णय घेता येतात, तिथे हिंसा सहज, सोपी होते. आधुनिक काळात नव्या तंत्रज्ञानामुळे लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे, ड्रोन अशा गोष्टींमुळे युद्ध करणं सोपं झालं आहे.
निर्णय घेण्यात भावनांचा खूप मोठा वाटा असतो. भावनांचा भाग आपल्या शरीराशी संवाद साधून ती माहितीही वापरत असतो. दरवेळी खूप साऱ्या माहितीवर खोलात विचार करायला वेळ नसतो. अशावेळी शरीर संकेत देऊन मदत करतं. उदा. घाम फुटणे, घशाला कोरड पडणे, स्नायू ताठ होणे, छातीत धडधडणे. आपण रस्ता ओलांडताना एखादं भरधाव वाहन आलं, तर आधी शरीर प्रतिक्रिया देतं आणि मग आपल्याला समजतं. पण दरवेळी शरीराचे संकेत आपल्याला जाणवत नाहीत. खूप सूक्ष्म पातळीवर ते चालू असतं आणि निर्णय त्यानुसार होत असतात. यासंदर्भात एक थक्क करणारा अभ्यास दाखवला आहे. सारखाच गुन्हा आणि सारखीच शिक्षा भोगलेल्या एका कैद्याला न्यायाधीश परोल देतो आणि दुसऱ्याला नाही. अशा प्रकारच्या एक हजार प्रकरणांचा अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं, की जेवणाच्या सुट्टीच्या थोडंसं आधी जे प्रकरण समोर येतं, त्यात परोल नाकारला जातो आणि जेवण झाल्यानंतर जे समोर येतं, त्यात दिला जातो! न्यायाधीशही त्यांच्या शरीरशास्त्रात कैद असतात! सकाळपासून काम केल्यावर जेवायच्या वेळेपर्यंत मेंदूची ऊर्जा कमी होते आणि त्याचा निर्णयावर परिणाम होतो. आपल्या शरीरात होणाऱ्या आणि आपल्याला अजिबात न जाणवणाऱ्या गोष्टी बऱ्याच निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्याला कोणता मुलगा/मुलगी आवडते, त्यातल्या कुणाशी आपण लग्न करतो ह्या सगळ्यात आपलं शरीर, त्यातले हार्मोन्स बरंच काही ठरवत असतात. आपल्याला मात्र आपण विचारपूर्वक, तर्कसंगत निर्णय घेतो, असं वाटत असतं.
राजकीय विचार आणि मतदानही धोरणं बघून, आपल्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्या मुद्द्यांवरून आपण ठरवतो, असं आपल्याला वाटत असतं. पण ह्याबाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा एक प्रयोग पाहायला मिळतो. काही हिंसक दृश्ये दाखवून त्याला माणसाची मज्जासंस्था कशी प्रतिक्रिया देते, त्याची निरीक्षणं नोंदवली जातात. त्याच लोकांकडून नंतर (ह्याच्याशी संबंधित नसलेला वेगळा प्रयोग आहे असं सांगून) राजकीय मतांबद्दल फॉर्म भरून घेतला जातो. ज्यांना हिंसेबद्दल जास्त घृणा वाटते, ते राजकीयदृष्ट्या उजवीकडे झुकलेले आढळून येतात. हिंसेच्या चित्रांना तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेवरून तुम्ही कुणाला मत देणार हे ९५% वेळा निश्चितपणे सांगता येतं!
आपल्या वेगवेगळ्या अनुभवांच्या वेळी कमी-जास्त प्रमाणात डोपामाईन हार्मोन आपल्या शरीरात तयार होते. त्यानुसार आपण अनुभवाचं आणि जगाचं मूल्यमापन करत असतो, प्राधान्यक्रम ठरवतो आणि भविष्याबाबत निर्णय घेतो. डोपामाईन जितकं जास्त, तितका अनुभव चांगला. मात्र खूपच जास्त डोपामाईन झाल्यास त्यातून माणूस व्यसनी बनतो. व्यसनमुक्तीसाठी मज्जातंतू विज्ञानाचा कसा उपयोग करून घेता येतो, तेही यासंदर्भात बघायला मिळतं.
विज्ञानातून आता समजलं आहे, की आपण म्हणजे एकच एक विशिष्ट काही नसतो. आपल्यामध्ये परस्परविरोधी, स्पर्धा करणारे बरेच गट असतात. हे जर आपण नीट समजून घेतलं आणि त्याचा उपयोग करून घेतला, तर आपण जास्त चांगले निर्णय घेऊ शकतो.
भाग ४ : निर्णय कसा घेतला
जातो?
आपले निर्णय आपल्याला
घडवतात. आपण आयुष्यभर पावलोपावली, दर वळणाला जे निर्णय घेतो, जी निवड करतो त्यातून
आपलं व्यक्तिमत्व आकार घेतं. हे निर्णय कसे घेतले जातात? आपला मेंदू क्षणोक्षणी निर्णय
घेत असतो, काही आपल्याला जाणवतात आणि बरेचसे जाणवतही नाहीत. माहिती मिळवणे,
अन्वयार्थ लावणे, वेगवेगळ्या पर्यायांचं मूल्यमापन करणे ह्या क्रिया मेंदूत सतत
चालू असतात. आपण जेव्हा दोन पर्यायांमधून एक निवडतो, तेव्हा त्या दोन पर्यायांसाठी
मेंदूत मज्जापेशींची दोन जाळी स्पर्धा करत असतात. ह्या दोन जाळ्यांमध्ये संघर्ष
सुरू असतो आणि जे जाळं जास्त जोर लावून जिंकतं, तो निर्णय घेतला जातो. पुरणपोळी
खायची की बासुंदी, भेळ की वडा-पाव अशा साध्या निर्णयांमध्येही मज्जापेशींची जाळी
भांडत असतात आणि आपल्याला ते कळतही नाही. ही वेगवेगळी जाळी म्हणजे आपलेच वेगवेगळे
भाग असतात. आपण स्वत:वरच रागावतो, स्वत:चीच समजूत घालतो, स्वत:लाच धीर देतो;
तेव्हा कोण बोलत असतं आपल्याशी? आपलेच वेगवेगळे भाग बोलत असतात. आपण एकसंध नसतो.
एकमेकांशी संघर्ष
करणाऱ्या मज्जापेशींच्या जाळ्यांचा अनुभव घेण्यासाठी ईगलमन एक छोटासा मजेदार प्रयोग
दाखवतात. वेगवेगळ्या कागदांवर रंगांची नावं लिहिलेली असतात. उदा. “लाल” असा शब्द
हिरव्या रंगात तर “निळा” असा शब्द लाल रंगात लिहिलेला असतो. बघणाऱ्याला त्या
शब्दाचा रंग कोणता ते सांगायचं असतं. हे सांगताना थोडीशी तारांबळ उडते. कारण रंग
ओळखणारं जाळं आणि शब्द वाचणारं जाळं ह्यांच्यात भांडण होतं. शब्द वाचणाऱ्या भागाला
खच्ची करून रंग सांगावा लागतो आणि म्हणून ते थोडंसं अवघड जातं. ह्याबाबत अजूनही
काही प्रयोग दाखवले आहेत.
निर्णय कसा होतो, ह्याचा एक प्रयोग दाखवला आहे. एका चित्रफितीत आगगाडीचं छोटं इंजिन रुळावरून येत आहे. त्याचे ब्रेक निकामी झाले आहेत. त्या रुळावर लांबवर इंजिनाकडे लक्ष नसलेले चार मजूर काम करत आहेत. ते इंजिनाखाली मरतील. पण तुमच्याकडे एक कळ आहे. ती दाबून तुम्ही ते इंजिन वेगळ्या रुळांवर वळवू शकता. तिकडे एक मजूर आहे. चार मजूर वाचतील आणि ते करताना एक मरेल. सहभागी झालेल्या प्रत्येकाने कळ दाबण्याचा निर्णय घेतला. आता ह्या प्रयोगात थोडासा बदल केला. आता कळ नाही, दुसरे रुळही नाहीत. तुम्ही जवळच्या टाकीवर उभे आहात आणि तुमच्या शेजारी एक जाड माणूस उभा आहे. तुम्ही जर वरून त्याला इंजिनाच्या वाटेत ढकलून दिलं, तर तो मरेल. पण त्याच्या शरीराच्या अडथळ्यामुळे इंजिन थांबेल आणि मजूर वाचतील. आता मात्र सहभागी झालेल्या प्रत्येकाने न ढकलण्याचा निर्णय घेतला. का बरं? काय बदललं? पहिल्या वेळी हा फक्त गणिताचा प्रश्न होता – एक जीव वाचवायचा की चार! दुसऱ्यावेळी स्वत:च्या हाताने एखाद्याला मृत्यूच्या तोंडी ढकलायचं म्हटल्यावर तिथे भावनिक प्रश्न निर्माण झाला आणि भावना हाताळणारं जाळं कामाला लागलं. त्याने गणिती जाळ्याला हरवलं. जिथे भावनिक गोष्टी दूर सारून निर्णय घेता येतात, तिथे हिंसा सहज, सोपी होते. आधुनिक काळात नव्या तंत्रज्ञानामुळे लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे, ड्रोन अशा गोष्टींमुळे युद्ध करणं सोपं झालं आहे.
निर्णय घेण्यात भावनांचा खूप मोठा वाटा असतो. भावनांचा भाग आपल्या शरीराशी संवाद साधून ती माहितीही वापरत असतो. दरवेळी खूप साऱ्या माहितीवर खोलात विचार करायला वेळ नसतो. अशावेळी शरीर संकेत देऊन मदत करतं. उदा. घाम फुटणे, घशाला कोरड पडणे, स्नायू ताठ होणे, छातीत धडधडणे. आपण रस्ता ओलांडताना एखादं भरधाव वाहन आलं, तर आधी शरीर प्रतिक्रिया देतं आणि मग आपल्याला समजतं. पण दरवेळी शरीराचे संकेत आपल्याला जाणवत नाहीत. खूप सूक्ष्म पातळीवर ते चालू असतं आणि निर्णय त्यानुसार होत असतात. यासंदर्भात एक थक्क करणारा अभ्यास दाखवला आहे. सारखाच गुन्हा आणि सारखीच शिक्षा भोगलेल्या एका कैद्याला न्यायाधीश परोल देतो आणि दुसऱ्याला नाही. अशा प्रकारच्या एक हजार प्रकरणांचा अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं, की जेवणाच्या सुट्टीच्या थोडंसं आधी जे प्रकरण समोर येतं, त्यात परोल नाकारला जातो आणि जेवण झाल्यानंतर जे समोर येतं, त्यात दिला जातो! न्यायाधीशही त्यांच्या शरीरशास्त्रात कैद असतात! सकाळपासून काम केल्यावर जेवायच्या वेळेपर्यंत मेंदूची ऊर्जा कमी होते आणि त्याचा निर्णयावर परिणाम होतो. आपल्या शरीरात होणाऱ्या आणि आपल्याला अजिबात न जाणवणाऱ्या गोष्टी बऱ्याच निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्याला कोणता मुलगा/मुलगी आवडते, त्यातल्या कुणाशी आपण लग्न करतो ह्या सगळ्यात आपलं शरीर, त्यातले हार्मोन्स बरंच काही ठरवत असतात. आपल्याला मात्र आपण विचारपूर्वक, तर्कसंगत निर्णय घेतो, असं वाटत असतं.
राजकीय विचार आणि मतदानही धोरणं बघून, आपल्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्या मुद्द्यांवरून आपण ठरवतो, असं आपल्याला वाटत असतं. पण ह्याबाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा एक प्रयोग पाहायला मिळतो. काही हिंसक दृश्ये दाखवून त्याला माणसाची मज्जासंस्था कशी प्रतिक्रिया देते, त्याची निरीक्षणं नोंदवली जातात. त्याच लोकांकडून नंतर (ह्याच्याशी संबंधित नसलेला वेगळा प्रयोग आहे असं सांगून) राजकीय मतांबद्दल फॉर्म भरून घेतला जातो. ज्यांना हिंसेबद्दल जास्त घृणा वाटते, ते राजकीयदृष्ट्या उजवीकडे झुकलेले आढळून येतात. हिंसेच्या चित्रांना तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेवरून तुम्ही कुणाला मत देणार हे ९५% वेळा निश्चितपणे सांगता येतं!
आपल्या वेगवेगळ्या अनुभवांच्या वेळी कमी-जास्त प्रमाणात डोपामाईन हार्मोन आपल्या शरीरात तयार होते. त्यानुसार आपण अनुभवाचं आणि जगाचं मूल्यमापन करत असतो, प्राधान्यक्रम ठरवतो आणि भविष्याबाबत निर्णय घेतो. डोपामाईन जितकं जास्त, तितका अनुभव चांगला. मात्र खूपच जास्त डोपामाईन झाल्यास त्यातून माणूस व्यसनी बनतो. व्यसनमुक्तीसाठी मज्जातंतू विज्ञानाचा कसा उपयोग करून घेता येतो, तेही यासंदर्भात बघायला मिळतं.
विज्ञानातून आता समजलं आहे, की आपण म्हणजे एकच एक विशिष्ट काही नसतो. आपल्यामध्ये परस्परविरोधी, स्पर्धा करणारे बरेच गट असतात. हे जर आपण नीट समजून घेतलं आणि त्याचा उपयोग करून घेतला, तर आपण जास्त चांगले निर्णय घेऊ शकतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा